चंद्रपूर : मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र शासन हे चंद्रपुर जिल्हाच्या दौ-यावर आले असतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे यांनी शिष्टमंडळासह त्यांना निवेदन देऊन घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक तात्काळ रद्द करुन घुग्घुस नगरपरिषदेची घोषणा करावी अशी मागणी केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने शहराची लोकसंख्या 40 ते 50 हजारांच्या जवळपास आहे. घुग्घुस हे चंद्रपुर जिल्हातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मागील 25 वर्षापासून घुग्घुस नगरपरिषदेची मागणी जोर धरत आहे.
घुग्घुस नगरपरिषदेच्या मागणी करीता घुग्घुस बंद, उपोषण, रस्ता रोको असे आंदोलन करण्यात आले आहे.
परंतू घुग्घुस नगरपरिषदेची मागणी पुर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे घुग्घुस शहरला विकासापासुन दुर ठेवण्यात येत असल्याने घुग्घुस वासीयांवर अन्याय होत आहे.
नुकतेच घुग्घुस येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक तात्काळ रद्द करुन घुग्घुस नगरपरिषदेची घोषणा करीत घुग्घुस नगरपरिषदेची निवडणुक घेण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.
निवेदन देतांना चंद्रपुर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटीभाऊ घोरपडे शिवसेना नेते बाळुभाऊ चिकनकर, गणेश शेंडे, अजय जोगी, वेदप्रकाश मेहता, युवासेनेचे चेतन बोबडे, कोमल ठाकरे, शिवसैनिक उपस्थित होते.