एसीसी सीमेंट कंपनी तर्फे वन अकादमी येथील कोविड रुग्णालयाला दोन व्हेंटीलेटर उपलब्ध

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर एसीसी सिमेंट कंपणीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून वन अकादमी येथील कोविड रुग्णालयाला वैशिष्टपूर्ण दोन व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हे व्हेंटीलेटर सदर कोवीड रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहण घूगे, एसीसी चे सि.एस.आर मॅनेजर विजय खटी, डॉ पंकज लोनगाडगे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सुर्यकांत खणके, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, विश्वजीत शाहा आदिंची उपस्थिती होती.

कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थीतीवर मात मिळविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाने आमदार निधीतील एक करोड रुपये व उदयोगांच्या सामाजिक दायित्व निधीतून विक्रमी वेळेत वन अकादमी येथे 100 ऑक्सिजनयुक्त खाटांचे सुसज्ज असे कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. दरम्याण कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभावित तिस-या लाटेची पुर्व तयारी म्हणून या रुग्णालयाकडे प्रामुख्याने पाहले जात आहे. त्यामूळे या रुग्णालयात आॅक्सिजनसह व्हेंटीलेटरचीही सुविधा उपलब्ध व्हावी या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात चंद्रपूरातील उद्योगांनी पुढाकार घेण्याचे आव्हान आ. जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच सदर रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी एसीसी सिंमेट कंपणीला केली होती. त्यांनतर एसीसी कंपणीने सामाजिक दायित्व निधीतून येथे दोन व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिले आहे.

हे व्हेंटीलेटर वैशिष्टपूर्ण असुन एका वेळेस दोन रुग्णांना जिवनदान देण्याची क्षमता या एका व्हेंटिलेटरमध्ये आहे. आज येथील डाॅक्टरांच्या व अधिका-यांच्या उपस्थितीत सदर दोन व्हेंटीलेटर रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आले आहे. मानवतावादी दृष्टीकोणातून एसीसी सिमेंट कंपणीने मागणीची तात्काळ दखल घेत सदर रुग्णालयासाठी दोन व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिल्याबंदल आमदार किशोर जोरगेवार यांनी एससीसीचे आभारही मानले आहे. तसेच येत्या काळात येथे आणखी व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले असून इतर उद्योगांनीही मदतीसाठी समोर येण्याचे आव्हान केले आहे.