घुग्घुस : सव्वीस वर्षापूर्वी 1995 मध्ये येथे लॉयड्स मेटल्स कंपनी गावाच्या मध्यभागी शुरू करण्यात आली या कंपनी मध्ये स्थायी स्वरूपात 106 कामगार तर अस्थायी स्वरूपात ठेकेदारी तत्त्वावर 430 कामगार असून कंपनीत देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे,राजू अडपेवार,रवी ठाकरे , अलका जंगम हे प्रमुख ठेकेदार आहेत ही कंपनी आपल्या गलथान कारभार व प्रदूषणामुळे जिल्ह्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे.
या कंपनीच्या विस्तारीकरणा करिता काल 30 जून रोजी कंपनी परिसरात जनसुनावणी आयोजित केली होती या जनसुनावणीत कंपनीतील कामगार अशपाक शेख यांनी सर्वां समोर कंपनीचे धिंडवडे काढले ही कंपनी अत्यन्त जीवघेणी असून अगदी जर्जर झाल्याचे त्यांनी सांगितले साधे बोट लावल्यास कंपनीच्या पत्रामध्ये भोकदाड होतो इतकी भीषण अवस्था असून विस्तारीकरणा आधी कंपनीची दुरुस्ती तथा कामगारांना सुरक्षिततेचे साधने उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी ही त्यांनी केली.
कंपनीच्या कामगारांनेच कंपनीची परिस्थिती उघड केल्याने व्यवस्थापकांची चांगलीच पंचायत झाली.