• कामगारांचा खणखणीत इशारा
• दालमिया भारत सिमेंट कामगार एक वटले
चंद्रपुर : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील मुरली सिमेंट उद्योग बारा वर्ष कामगारांनी काम केलं हे उद्योग बंद पडल्याने येथील कामगार बेरोजगार झाले त्या कालावधीतील मजुरांना कामाचा मोबदला कंपनीने दिले नाही. याचा संघर्ष बरेच वर्षे चालला त्यानंतर या कंपनीचे अधिग्रहण हस्तांतर दालमिया भारत या सिमेंट उद्योगाला देण्यात देण्यात आला.
त्यावेळी पूर्वीच्या कामगारांना समावेश केल्या जाईल अशा प्रकारचा शब्द कंपनीने दिला मात्र कंपनीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकाम व सिमेंट उत्पादनाला सुरुवात केली मात्र हजारो कामगारांचा प्रश्न निकाली न काढता व स्थानिक मजुरांना कामावर रुजू करून न घेता थकबाकी देयके न देता कंपनीने सिमेंट उत्पादक करून विक्री सुरू केली होती.
मात्र कामगारांचा प्रश्न निकाली न लागल्याने संपूर्ण कामगार संघटना एकवटल्या मात्र कंपनी व्यवस्थापन स्थानिक कामगार यांच्या कडे दुर्लक्ष करून ठेकेदारामार्फत पर राज्यातील मजुरांचा भरणा करून शोषण करीत असल्याने मजुरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन दिनांक सहा जुलै पासून बैठा सत्याग्रह आंदोलन कुटुंबासह सुरू केले आहे मात्र प्रशासन व व्यवस्थापन या बाबीकडे दुर्लक्ष करून सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशांचे पालन न करता कामगार संघटना कडे दुर्लक्ष केल्याने कामगारांचे प्रश्न रखडले आहे.
मुरली सिमेंटच्या 2015 पर्यंत कामगारांचे थकित मजुरी लेखी आश्वासन देऊनही अजूनही दिले नसल्याने पाचशे कामगारांना आर्थिक मानसिक त्रास होत आहे. जे पूर्वी कामावर होते अश्या सर्व कंत्राटी कामगार तसेच पॅकिंग प्लांट व कायमस्वरूपी कामावर असलेल्या कामगारांना न्याय न देता नवीन परप्रांतीय मजुरांना 280 ते साडेतीनशे रुपये मजुरीवर कंत्राटदार मार्फत कामावर घेतल्या जात आहे. यामुळे स्थानिक मजुरांमध्ये चीड निर्माण झाली असून व्हेज बोर्ड नुसार स्थानिक मजुरांना देयके दिल्या जात नाही तसेच जे मजूर कामावर आहेत त्यांचा पीएफ कपात केल्या जात नसल्याने मजूरांचे भविष्य धोक्यात आले आहे.
काही कारणास्तव मजूर एक दोन दिवस कामावर गेला नाही तर त्यांना कामावर काढून देण्याची धमकी कॉन्ट्रॅक्टदार मार्फत धमकी दिल्या जाते यामुळे असंतोष वाढला असून मजुरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक कामगारांच्या मागणीचा प्रश्न सोडविण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगारांची संयुक्त बैठक घेऊन कामगाराची मागणी व समस्य सोडवण्याचा प्रयत्न करावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद आबिद अली यांनी या मंडपाला भेट देऊन कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावे पूर्वीच्या कामगारांना समावेश करावा अन्यथा बाहेरच्या मजुरांना आणून काम करण्याचा प्रयत्न निषेधार्थ असल्याने स्थानिक कामगार रस्त्यावर उतरतील व आपल्या हक्काची लढाई लढल्याशिवाय थांबणार नाही कामगारांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक मजुरांना कामावर रुजू करावे अशी मागणी केली असून लवकरच कामगार मेळावा नाराडा येथे घेऊन व प्रशासनासोबत बैठकीची मागणी बैठक करून कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्या जाईल अशी माहिती कामगार नेते रमेश वेटी गजानन खाडे गुरुदास वराते यांनी दिली.