पोलिस अधिक्षक यांची भेट घेत केल्या सुचना
चंद्रपूर : दारुबंदी उठविण्यात आल्याने शहरातील अनेक बिअरबार व देशी दारुची दुकाने सुरु झाली आहे. त्यामूळे दारू दुकानासमोर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. तसेच अनेक नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे हि बाब लक्षात घेता उद्भवत असलेल्या तसेच भविष्यात उद्भवणार असलेल्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक विश्वजित शाहा, शंकर वराडकर यांची उपस्थिती होती.
चंद्रपूकरांची मागणी लक्षात घेता जिल्हातील दारुबंदी उठविण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हातील दारु दुकाने सुरु करण्यात आली आहे. मात्र काही बार मालक व देशी दुकान मालक दुकानाबाहेरच दारु विक्री करतांना दिसून येत आहे. तर काही मद्यविक्रीच्या दुकांनापूढे मध्यप्रेमींची गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे. या सबंधित त्यांनी आज पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेतली असून त्यांना अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहे. दारु सुरु झाल्याने अवैध दारु विक्री करणा-या गुंड प्रवृतीच्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे.
त्यामूळे त्यांच्याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष ठेवावे तर काही अतिउत्साही मध्यप्रेमींमूळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशावंरही लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षकांना केल्या आहे.