चंद्रपुर : बल्लारपूर येथील शिवाजी वाॅर्डातील रहिवासी, एका नवऱ्याने आपल्याच बायकोची गळा आवळून हत्या केली, याची कबुली तो स्वत:च देत आहे, तर दुसरीकडे त्याच्याच सुनेने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता उघडकीस आली.
काजल डे असे स्वत:ला हत्यारा म्हणणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन डे कुटुंबातील दोन्ही महिलांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु काजल डे यांची पत्नी आशा डे (४५) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. काजल याची सून प्रियंका हिच्यावर चंद्रपूर शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. काजल हा ऑटो चालक असून त्याची पत्नी आशा कॅन्सरने ग्रस्त होती. या घटनेचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.