पोलिस शिपायाने केली युवतीची छेडछाड

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे म्हणून दारूबंदी हटविण्यात आली असा संदर्भ शासनाच्या अधिसुचनेत दिला गेला मात्र दारूबंदी हटल्यावर गुन्हेगारांना मोकळे रान झाले असून दिवसेंदिवस वाटमारी, गॅंगवार व छेडखानीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
महिला सुरक्षेप्रती शासन तत्पर आहे असे वारंवार सांगितल्या जाते मात्र जेव्हा पोलीस प्रशासनातील कर्मचारी महिला – युवतीची छेड काढत असेल तर दाद मागायची कुठं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

15 जुलै ला जनता कॉलेज चौकात 33 वर्षीय युवती आपल्या नातेवाईकांकडून जेवण केल्यावर घरी परत असतांना पोलीस शिपाई सुनील वरभे यांनी त्या युवतीचे दुचाकी वाहन थांबवित अश्लील भाषेत असभ्य वर्तन केले.

त्यावेळी पोलीस शिपाई वरभे हे दारूच्या नशेत होते असा आरोप युवतीने लावला आहे, त्यानंतर मात्र जनता कॉलेज चौकात युवतीच्या वादात उतरली, पोलीस व नागरिक असा वाद त्याठिकाणी वाढल्याने, युवतीने रामनगर पोलीस स्टेशन गाठत वरभे यांच्या विरोधात तक्रार दिली.

युवतीने प्रतिक्रिया देताना सांगितले की महिला व मुलींसाठी चंद्रपूर हा सुरक्षित आहे मात्र जेव्हा पोलिसच असे कृत्य करणार तर आम्ही दाद मागायची कुणाला? पोलीस शिपाई वरभे यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी त्या युवतीने केली आहे.