भद्रावती तालुक्यातील ग्रामीण जनतेसोबत ‘प्रत्यक्ष भेटी व कोरोना जनजागृती उपक्रम’
चंद्रपूर : कोरोना सारखी संसर्गजन्य परीस्थिती पुन्हा उद्भवू नये. मात्र अशा परीस्थितीला सामोरे जाण्याची हिमंत ठेवा. या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला माझ्याने जमेल ते सहकार्य करण्याचा मी सतत प्रयत्न करत राहील. कसलीही तमा न बाळगता प्रत्येक गावात जावून प्रत्येकाच्या भेटी मी घेत राहणार. कोरोना आहे तोपर्यंत आता एक हात मदतीचा हा उपक्रम सुरु राहील. मी सदैव आपल्या सोबत आहो, असे प्रतिपादन रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे रवि शिंदे यांनी आज (दि.२२) ला केले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा भद्रावती तालुक्यात एक हात मदतीचा उपक्रम अविरत सुरु आहे. या उपक्रमांतर्गत ट्रस्टच्या वतीने कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत केल्या जात आहे व ग्रामीण जनतेसोबत प्रत्यक्ष भेटी घेवुन कोरोना जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
आज (दि.२२) ला तालुक्यातील माजरी, कोंढा, चालबर्डी, पळसगाव, पाटाळा, मनगाव, राळेगाव, कुचना या गावांमधे मुसळधार पाऊस सुरु असतांनाही रवि शिंदे यांनी गावक-यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, कोरोनाने मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थीक सहकार्य केले. पुढेही ग्रामीण जनतेला जमेल ते सहकार्य करण्याचे आस्वासन दिले.
यावेळी रवि शिंदे यांचे सोबत जि.प. सदस्य प्रवीण सुर, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, ग्रा.पं.सदस्य रवि भोगे, कोंढाचे सरपंच महेश मोरे, पोलिस पाटील मनिष देवगडे, सेवा संस्थाचे अध्यक्ष बाळा मत्ते, संचालक हरी मत्ते, पांडूरंग भोयर, माजी सरपंच अविनाश गोंडे, माजी पं.स. सभापती जिवनकला मत्ते, उपसरपंच मंगेश मंगाम, कालिदास उपरे, सरपंच विजय खंगार, उपसरपंच कल्पना भुसारी, माजी सरपंच अविनाश गोंडे, माजी ग्रा.प. सदस्य मंगेश देवगडे, बंडूभाऊ झाडे, महादेव मत्ते, ग्रा.पं. सदस्य लता दानव, नामदेव डाहुले, फकरु डाहुले, अशोक निब्रड, दिपक डाहुले, बेबिताई उपरे, हरीदास उपरे, दशरथ डाहुले, जेष्ठ नागरीक पुरुषोत्तम ऊरकुडे, गजानन सुर, सिंधूताई रांगणकर, भारत वांढरे, उपसरपंच विठ्ठल येरेकर, प्रविण वांढरे, नागो मिलमिले, विजय काकडे, सुभाष डाखरे, अनिलभाऊ पिदुरकर, विवेक पिदुरकर, बंडू पा. आगलावे, संदीप एकरे, बंडू मांढरे, विनोद वाटेकर, रामदास पिदुरकर, प्रफुल पिदुरकर, कान्होबा तिखट, सरपंच सुचिता ताजणे, गणपत महातळे, देवराव अवथरे, बबनराव बतकी, वसंतराव वैद्य, प्रफुल ताजने, नरेंद्र ताजणे, दत्तात्रय महातळे, आदी उपस्थित होते.
भर पावसातही मोठ्या संख्येने ग्रामीण जनतेसह यावेळी संपर्क साधण्यात आला.