धानोरा येथील वर्धा नदीच्या पात्रा जवळ दोन मृतदेह आढळले

चंद्रपूर : मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरु असल्याने या क्षेत्राच्या प्रवाहित मुख्य वर्धा नदीला ओसंडून पुर आला तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे.

शनिवार 24 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता धानोरा येथील वर्धा नदीच्या पात्रा जवळ दोन मृतदेह आढळले. शुक्रवार 23 जुलै रोजी धानोरा-गडचांदूर पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला होता त्यामुळे वर्धा नदीच्या पुराच्या प्रवाहात एका महिलेचा व एका पुरुषाचा मृतदेह वाहून येत वर्धा नदीच्या पात्रा जवळ एका झाडाला अडकला.

शनिवार 24 जुलै रोजी सकाळी धानोरा येथील वर्धा नदीचे पाणी ओसरताच शेतात काम करणाऱ्या नागरिकांना हे दोन मृतदेह नदीच्या पात्रा जवळ अडकून दिसताच घुग्घुस पोलिसांना ही माहिती देण्यात आली. सहा.पो.नि.मेघा गोखरे, पोहवा. उमाकांत गौरकार, निलेश तुमसरे, सचिन वासाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पोलिसांनी पंचनाम करून मृतदेह शवविच्छेदणासाठी चंद्रपूर येथे पाठविला आहे. मृतकांची ओळख पटली नसून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.