अन् बंदुक चालविणारे हात पापड, लोणंच, मसाले बनवायला सरसावले!

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आत्मसमर्पित महिला नक्षलींनी घेतले स्वयंरोजगाराचे धडे : आरसेटी, व जिल्हा पोलिस दलाचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली च्या जंगल परिसरात मुक्त संचार करत बंदुक चालवणाऱ्यां किंबहुना अनेकाच्या मुत्यूस कारणिभूत ठरलेल्या पृर्वाश्रमीच्या जहाल महिल नक्षलवादी आता चक्क पापड, लोणचं, व मसाला बनवून स्वयंरोजगाराकडे वाटचाल करीत असुन ही किमया जिल्हा पोलीस दल व आरसेटी स्वयंरोजगार संस्थेने घडविली.

उद्योग विरहीत गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य आदीवासी पुरूष आणि ईच्छा-अनिच्छेने महिला देखील नक्षल चळवळीत समाविष्ट होऊन समाज विरोधी विघातक कृत्य करण्यात गुंतले असतांना त्यांना या दुष्कृत्यांपासून परावृत्त करण्याचा व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा माननीय जिल्हा पोलिस अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आटोकाट प्रयत्न करत आहे.

आत्मसमर्पीत महिलांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून अशा २५ महिलांना वरील प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात आरसेटी चंद्रपूर च्या तज्ज्ञ मार्गदर्शक गिता मेडपिलवार यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले तर आरसेटी फॅकल्टी द्वारा उद्योजकता विषयक क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न केला.

आयुष्यात ज्यांनी कधी पापड लोणची बघितलं नाही त्या दुर्गम जंगलात भटकंती वर असलेल्या बंदूका शस्त्र हाताळणाऱ्या या महिला यशस्वीरित्या पापड लोणची मसाले तयार करू शकतात हे प्रशिक्षणाअंती मूल्य मापन करतांना सिद्ध झाल्याचे व त्या व्यवस्थीतपणे गृहोद्योग करण्यास सक्षम असल्याचे परीक्षक श्री पी डी काटकर सर आणि वर्षा नांदगावे यांनी सांगितले.
दाखल झालेल्या २५ महिला पैकी महिला नैसर्गिक नियम धर्म प्रक्रिया चालू झाल्याने जुनाट सामाजिक रूढी परंपरांचा बळी ठरलेली एक महिला इतरांमध्ये मिसळून प्रशिक्षण पूर्ण करू न शकल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आणि आदिवासी महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे असे श्री काटकर सरांनी मुल्यमापन करतांना प्रतिपादन केले.

शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटीबद्ध आहे, गरज आहे ती तुम्हाला पुढे येऊन सन्मान जनक जीवन जगण्याची व आपली मानसिकता सकारात्मक करण्याची!” अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री अंकित गोयल यांनी प्रमाण पत्र वितरण व प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात व्यक्त केल्या. याप्रसंगी जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक श्री समिर शेख, रूडसेटी बेंगलोर द्वारा परीक्षक श्री पी डी काटकर, आरसेटी गडचिरोली संचालक श्री चेतन वैद्य, कार्यक्रम समन्वयक श्री हेमंत मेश्राम, प्रशिक्षक गिता मेडपिलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक श्री गंगाधर ढगे, सहकारी श्री भैयाजी कुलसंगे व श्री मधुकर रत्नम, यांनी सहकार्य केले. संचलन व आभार प्रदर्शन समन्वयक श्री हेमंत मेश्राम यांनी केले.