ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% तर ईडब्लुएस ला १०% आरक्षण लागू : डॉ अशोक जीवतोडे

चंद्रपुर : ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण व ईडब्लुएस ला १०% आरक्षण देण्याचा निर्णय शेवटी आज (दि.२९) ला केंद्र सरकारने लागु केला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हे मोठे यश असल्याचे ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी आज येथे सांगितले व केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या संदर्भात केंद्राने नुकतेच निर्देश दिले होते. मात्र आज (दि.२९) ला सरकारने या संदर्भात निर्णय घेतला. याचा लाभ राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना मेडीकलमधे प्रवेश मिळण्यासाठी होणार आहे. राज्यातील मेडीकल प्रवेशित ओबीसी विद्यार्थ्यांना युजी मधे १५% कोट्यात व पीजीमधे ५०% कोट्यात २७% आरक्षण सत्र २०२१-२२ पासून मिळणार आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नाचे हे मोठे यश असल्याचे डॉ. अशोक जिवतोडे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.