पुन्हा एका मर्डरने बल्लारपूर हादरले

चंद्रपूर : बल्लारपुर शहरातील हत्यासत्र अजुनही थांबत नसून आज रात्री ७ वाजताच्या सुमारास बल्लारपुर शहर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरून गेला आहे.

प्राप्त माहितीनुसार आज रात्री ७ वाजताच्या सुमारास बल्लारपुर सास्ती मार्गावर अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने गळा कापुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सदर युवक वेकोलि कर्मचारी असल्याची चर्चा आहे. आज पुन्हा एकदा शहरात रक्ताचे पाट वाहिले असुन मागील काही काळातील गुन्हेगारी वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे झालेल्या गोळीबाराचे तार सुद्धा बल्लारपुर शहराशी जोडल्या गेले होते. त्या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असुन त्यांचे बल्लारपुर कनेक्शन समोर आले आहे.

बल्लारपुर शहरात सातत्याने गुन्हेगारी वाढत असुन हत्या, हत्येचे प्रयत्न ह्यांसारख्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असुन पोलिसांची भुमिका मात्र संशयास्पद असुन बल्लारपुर पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

आतातरी जिल्हा पोलीस अधिक्षक ह्या बाबींची गांभीर्याने चौकशी करून गुन्हेगारीवर आळा घालावा तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर निर्माण होणार्‍या प्रश्नावर काय कारवाई करणार ह्याकडे बल्लारपुरा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.