पतीच्या हत्येनंतर प्रियकरासोबत लग्न करण्याचा डाव पोलिसांनी उधळला

• मृत्यूनंतर पतीची नोकरी मिळविण्याचा होता डाव

चंद्रपूर : पतीच्या हत्येनंतर त्यांची नोकरी मिळवून
प्रियकरासोबत लग्न करण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. मारोती शंकर काकडे (वय ४४) असे मृत पतीचे नाव आहे. २९ जुलैला त्यांची सास्ती पुलाजवळ हत्या करण्यात आली होती. पत्नी प्राजक्ता (वय २५)काकडे सह तिचा तिचा प्रियकर आणि अन्य दोन जणांना हत्या प्रकरणात अटक केली.

सास्ती पुलाजवळ २९ जुलैला वेकोली कर्मचारी ४४ वर्षीय मारोती शंकर काकडे या इसमाचा मृतदेह मिळाला होता. पोलिस तपासात प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मृतकाची पत्नी प्रियंकाचे एका युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. हत्येनंतर नोकरी मिळेल आणि त्यानंतर प्रियकराशी विवाह करता येईल म्हणून पतीच्या हत्येची योजना आखल्याची कबुली पत्नी प्राजक्ताने दिली आहे.

पत्नी प्राजक्ताचे नकोडा येथील २५ वर्षीय संजय मारोती टिकले या तरुणासोबत प्रेमाचे सूत जुळले होते. मागील एका वर्षांपासून ते मारोतीचा काटा काढण्यासाठी योजना आखत होते. या प्रकरणात प्राजक्तासह तिची आई कांता भशाखेत्रे (वय ४१), प्रियकर संजय टिकले आणि वाहन चालक विकास नगराळे यांला पोलिसांनी अटक केली.