चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी त्यांची कार्यकारीणी जाहीर केली आहे. भाजपाच्या चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) सरचिटणीस पदी राजेश मुन, नामदेव डाहुले आणि क्रिष्णा सहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोच्या जिल्हाध्यक्ष पदी आशिष देवतळे तर भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी अल्का आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यकारीणीच्या उपाध्यक्ष पदी सर्वश्री चंद्रकांत गुंडावार, डॉ. भगवान गायकवाड, केशव गिरमाजी, नारायण हिवरकर, निलम राचलवार, आनंद कोरे, विनायक देशमुख, हिरामण खोब्रागडे, सतिश धोटे, राजेंद्र बोरकर, बबन निकोडे, डॉ. गोकुलदास बालपांडे, प्रशांत आर्वे, शेखर चौधरी, मधुकर नरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव पदी वाघुजी गेडाम, अहतेशाम अली, राजु देवतळे, दिपक सातपुते, राजु गायकवाड, विशाल गज्जलवार, सुनिल नामोजवार, माणिक थेरकर, संतोष तंगडपल्लीवार, हरिदास झाडे, सौ. रश्मी पेशने-खानोरकर, सौ. रोहीणी देवतळे, सौ. दिपाली मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा भाजपाच्या कोषाध्यक्ष पदी राजीव गोलीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसिध्दी प्रमुख पदी श्रीकांत मलोझलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नुतनकुमार जिवने, अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड. हरिश गेडाम, अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शेख जुम्मन रिझवी, किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी राजु घरोटे, इतर मागासवर्गीय मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश पाल, कामगार आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी उमेश बोढेकर, उद्योग आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी सुबोध कासुलकर, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी सुरेश केंद्रे, दिव्यांग आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी श्रीराम पान्हेरकर, सहकार आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी किशोर बावणे, कायदा आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी अॅड. रणंजय सिंग आणि सहसंयोजकपदी अॅड. इब्राहीम जव्हेरी, सांस्कृतिक आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी प्रा. सदानंद बोरकर, शिक्षक आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी गुरुदास कामडी, मच्छिमार आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी संतोष नागपुरे, दक्षिण भारतीय आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी राजु गुंडेटी, ट्रान्सपोर्ट आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी राजु दारी तर सोशल मिडिया आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी राकेश कोंडबत्तुनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारीणीच्या सदस्यपदी निलेश खरबडे, बुच्चय्या कंदीवार, प्रविण सातपुते, तुळशिराम श्रीरामे, किशोर पंदीलवार, हनुमान काकडे, प्रकाश उत्तरवार, ज्ञानेश्वर भोयर, संजय उपगन्लावार, बाबाभाऊ भागडे, अरुण मस्की, अशोक हजारे, विकास मोकाशी, संदीप किन्नाके, प्रमोद धात्रक, विश्वनाथ निमकर, सोनकुसरे गूरुजी, भाऊराव चंदनखेडे, विलास बोनगीरवार, नत्थु ढवस, मनोहर कुळसंगे, संजय मुसळे, कमलाकर सिध्दमशेट्टीवार, शामराव गेडाम, बळवंत पिपरे, प्रविण सुर, किशोर अगस्ती, नरेंद्र इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. रामदासजी आंबटकर, आ. प्रा. अनिल सोले, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, जैनुद्दीन जव्हेरी, सुदर्शन निमकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आदिंनी अभिनंदन केले.