बर्थ डे पार्टी घातक वळणावर ?
घुग्घुस : भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांचा वाढदिवस 21 नोव्हेंबर रोजी गांधी चौक घुग्घुस येथे 21 किलोच्या केक कापून आतिषबाजी करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस कोरोना संसर्गा पासून बचावाचे कुठलेच नियम पाळण्यात आले नाही.
रक्तदान कार्यक्रमा नंतर देण्यात येणाऱ्या हेल्मेट व कूल जार घेण्यासाठी ही लांबलचक रांग लागली होती.
यानंतर एक रक्तदाता भाजप पदाधिकारी कोरोना संक्रमित झाल्याचा धक्कादायक प्रकार उघळकीस आला होता.
हा वाढदिवस कार्यक्रम घुग्घुस शहरात कोरोना प्रसारासाठी कारणीभूत ठरतोय वाढदिवस कार्यक्रमा नंतर भाजप पक्षाचे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने संक्रमित होत आहे.
यांच्यातही धक्कादायक बाब म्हणजेच संक्रमित कार्यकर्ते हे विविध प्रकारचे व्यापारी असल्याने अजून ही स्तिथी धोकादायक होत आहे.
यासोबतच एक प्रमुख महिला सभापतीच्या कुटुंबातील तीन व्यक्ती कोरोना संक्रमित झाले आहे.
यांनीं आपली कोरोना चाचणी चंद्रपुर येथे करवून घेतली हे विशेष.
घुग्घुस येथे आजपर्यंत जवळपास 320 नागरिक हे कोरोना बाधित झाले आहेत. भाजप पक्षाच्या नेत्यांतर्फे लॉकडाऊन काळात ही 32 केक वाला वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात चर्चिल्या गेला होता.