ब्रम्हपुरी : गांगल वाडी पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचगाव येथे वाघाच्या हल्ल्यात बाई ठार .वय अंदाजे 70 ते 75 वर्ष .ही घटना आज सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान घडली. घटनास्थळ हे अगदी गावात असून पाण्याच्या टाकीजवळ ठेंगरी आडनावाच्या बाईला ठार केले.
ज्या बिबट्याने डोरली येथे आठ दिवसा अगोदर बाईला ठार केले तोच बिबट असावा असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. काल सायंकाळी सातच्या सुमारास गावातील काही लोकांनी त्याला पाहिले. त्यांनी लगेच आरडाओरड केला असता बिबट धूम ठोकून त्याने जंगलात पळ काढला.