चंद्रपूर | चार मृत्यू , 66 नव्याने पॉझिटिव्ह ; 198 कोरोनामुक्त

0
15

आतापर्यंत 18,860 बाधित झाले बरे, उपचार घेत असलेले बाधित 1,671

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 198 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 66 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 854 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 860 झाली आहे. सध्या एक हजार 671 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 55 हजार 952 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 32 हजार 915 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये तुकुम चंद्रपूर येथील 57 वर्षीय पुरूष, अंबादेवी वार्ड, वरोरा येथील 72 वर्षीय महिला, वानोजा ता. वरोरा येथील 61 वर्षीय पुरूष व आष्टी ता. वरोरा येथील 72 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 323 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 300, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 66 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 16, चंद्रपूर तालुक्यातील 16, भद्रावती 17, सिंदेवाही एक, मुल दोन, गोंडपीपरी एक, राजुरा एक, चिमुर सात व कोरपना येथील पाच रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleरा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी डॉ. सोपानदेव पिसे यांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here