बंद करीता काँग्रेसने घेतला पुढाकार
घुग्घुस : केंद्र शासनाने तीन नवीन कृषी कायदे पारीत केले असून हे कायदे शेतकरी विरोधात असल्याचा ठपका ठेवत पंजाब, हरियाणा, बिहार सह देशभरातील शेतकरी बांधवानी मागील तेरा दिवसापासून दिल्ली येथे गारठून टाकणाऱ्या थंडीत केंद्र शासना विरोधात आंदोलन शुरू केलेले असून या आंदोलन कर्त्यावर पोलिसांनी वॉटर कॅनन पाण्याचा मारा करणे लाठीचार्ज करणे रस्त्यात मोठे – मोठे खड्डे करून त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे.
एकीकडे सरकार चर्चा करीत असून दुसरीकडे शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी अतिरेकी संबोधून बदनाम करण्याचा कट कारस्थान भाजप आय टी सेल व नेते कार्यकर्ते करीत आहे.
तेरा दिवसापासून शुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश न आल्यामुळे शेतकरी संघटने तर्फे 08 डिसेंम्बर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले.
शेतकरी आंदोलनाला प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार व खासदार बाळु धानोरकर यांनी आपला पाठिंबा दिला आहे त्या अनुषंगाने आज घुग्घुस शहर काँग्रेस, जिल्हा किसान काँग्रेस, एस्सी सेल, युवक काँग्रेस तर्फे घुग्घुस बंदचे आवाहन करण्यात आले याला घुग्घुस येथील व्यापारी बांधव तसेच नागरिकांनी शंभर टक्के समर्थन देऊन आपले व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली सकाळी 08 ते 10 च्या दरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संपूर्ण घुग्घुसचा दुचाकीने दौरा करून किरकोळ शुरू असलेले दुकाने विनंती करून बंद करण्यास लावले याप्रसंगी घुग्घुस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बंदच्या यशस्वीते करीता घुग्घुस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, एस्सी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक उपाध्यक्ष सिनू गुडला, शहजाद शेख, कल्याण सोदारी, बापूजी क्षीरसागर, प्रेमानंद जोगी, योगेश ठाकरे, अंकुश सपाटे, रंजित राखूनडे, देवानंद ठाकरे, सुधाकर जुनारकर, दीपक पेंदोर, सुनील पाटील, व मोठया संख्येने पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
