वरोरा नगर परिषदेने मालमत्ता करात केलेली दरवाढ रद्द करा
वरोरा : कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असतांना वरोरा नगर परिषदेने यावर्षी मालमत्ता करात केलेली दहा टक्के करवाढ रद्द करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी केली आहे.
कोरोणामुळे एप्रिल महिन्यापासून पाच-सहा महिन्याच्या लॉकडाउनमुळे नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आले आहे. अनेकांचा रोजगार गेला असुन, लहान व्यावसायिक संकटात आहे. अशा परिस्थितीत वरोरा नगर परिषदेने यावर्षीपासून मालमत्ता कर दहा टक्क्यांनी वाढविला आहे.
वरोरा नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव करून केलेली दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी केली आहे. शिवाय गरीब मालमत्ताधारकांना, झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या पाणीपट्टी व मालमत्ता करात पन्नास टक्के सूट देण्यात यावे.विविध थकित कराच्या व्याजाची, दंडाची पुर्ण रक्कम माफ करण्यात यावी व यावर्षी सक्तीने कर वसुली करू नये अशी मागणीही टिपले यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष एहतेशाम अली, विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम,मुख्याधिकारी विजय देवळीकर यांचेशी आज चर्चा करुन निवेदन दिले.याप्रसंगी कॉंग्रेसचे सचिव मनोहर स्वामी,उपाध्यक्ष सलीम पटेल उपस्थित होते.करवाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा वरोरा शहर कॉंग्रेस कमेटीतर्फे देन्यात आला आहे.