प्रा. अनिल पोडे यांनी स्वतःचा वाढदिवसात वृद्धांना दिला काठीचा आधार

0
34

कोरपना : समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून सृष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूरचे अध्यक्ष प्रा. अनिल पोडे यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

त्यासाठी त्यांनी वरोडा, नवेगाव व शांतीनगर येथील ५० वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरित केल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सुनिल वांढरे, उपसरपंच नंदू तेलंग, प्राचार्या पोर्णिमा पोडे, अक्षय कायडिंगे, दिनेश घागरगुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती  सुनिल उरकुडे यांनी अध्यक्षीय भाषणातुन प्रत्येक युवकांनी म्हातारपणात आपल्या आई-वडिलांची सेवा करावी  व  त्यांचा इतिहास जाऊन बघावा असे सांगितले. आज आपल्याकडे शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून आपण कास्तकारी करतो. मात्र त्यांच्या काळात त्यांनी खांद्यावर नांगर घेऊन शेतापर्यंत जात होते. आपल्यासाठी ते दिवस-रात्र राबराब राबत होते. मात्र आता त्यांच्यावर वृद्धत्व आले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता आपली एक संपत्ती म्हणून त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रा. अनिल पोडे यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला व उतरत्या वयात वृद्धांच्या मनात आनंदाचा क्षण आणला.

कार्यक्रमाचे संचालन कोमल काळे यांनी केले तर आभार रिता हनुमंते यांनी मानले. यशस्वितेकरिता एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल वरोडा येथील सर्व शिक्षक व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here