युवकांनी मानले खासदार बाळू धानोरकरांचे आभार

0
28

काही दिवसातच मागणीचा पाठपुराव्याला यश : आय लव्ह चंद्रपूर मजकुराचे ग्लो साइन बोर्ड लागला

चंद्रपूर : मोठ्या शहरात प्रवेश करताना त्या शहराची ओळख होत असते. परंतु चंद्रपूर याला अपवाद आहे. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना शहराची ओळख करणारे आय लव्ह चंद्रपूर मजकुराचे ग्लो साइन बोर्ड लावण्याची मागणी काही दिवसा आधी नमस्ते चांदा फाउंडेशन ने केली होती. त्याची दखल घेत खासदार बाळू धानोरकर यांनी पाठपुरावा करून काही दिवसातच हि मागणी पूर्ण केली. त्यामुळे येथील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात युवक खासदार बाळू धानोरकरांचे आभार मनात आहे.
कोरोना विषाणूने लॉकडाउन लागले. यामुळे अनेकांनी घरची वाट धरली. पुणे, मुंबईत मोठ्या पदांवर नोकरीवर असलेले घरी परतले. त्यातून दुरावलेले मित्र एकत्र आले. त्यांनी एकत्र येत नमस्ते चांदा क्लब स्थापन केले. याच क्लबच्या माध्यमातून दुरावलेल्या या बालमित्रांनी समाज चळवळ सुरू केली.
चंद्रपूर शहरात देखील मोठ्या शहर प्रमाणे विकास झाला पाहिजे. हि भावना या युवकांनी मनात बाळगली आहे. मोठ्या शहरात शहराची ओळख होण्याच्या किंवा वेगळं काही वस्तू दिसत असते. परंतु चंद्रपूर येथे मात्र असल्या कोणत्याच प्रकारची वस्तू दिसून येत नाही. चंद्रपूर हे ऐतिहासिक नगरी आहे. गोंडराजाच्या वारसा ह्या शहराला लागला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, उद्योग अनेक महत्वाचे ठिकाण आणि वारसा या शहराला लाभला आहे. त्यामुळे या शहराची ओळख नवीन पिढीला होण्याकरिता नमस्ते चांदा फाउंडेशन ने खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे मागणी केली आहे. हि देखील मागणी लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी युवकांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here