त्या नेत्यांच्या भूलथापा व दिशाभूलीमुळे नगरपरिषद विरोधात दाखल केले आक्षेप

0
385

घुग्घुस (चंद्रपूर) : जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीला लवकरच नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा शासकीय स्तरावर हालचाली सुरू असून यांचा फटका भाजप पक्षाला बसणार असून जिल्हापरिषदचे महिला व बालकल्याण सभापती व पंचायत समिती उप – सभापती पद गोटणार असल्याने नगरपरिषद होऊ नये याकरिता षड्यंत्र रचल्याजात असल्याचे व खोट्या आक्षेपी दाखल करवून घेतल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
नगरपरिषदची उदघोषणा जाहीर झातयानंतर
जिल्हाधिकारी कार्यलयातून नगरपरिषद स्थापन करण्याबाबत स्थानिक स्तरावरून लेखी आक्षेप मागविण्यात आले.
जवळपास पन्नास हजार लोकवस्तीच्या घुग्घुस मधून सहा लेखी आक्षेप प्राप्त झाले.
संबंधीत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हाधिकारी समक्ष 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात आली यामध्ये फक्त दोन आक्षेपकर्ते हजर झाले व त्यांनी आपण लिखित दिलेले आक्षेपा व्यतिरिक्त अजून काही म्हणायचे नसल्याचे सांगितले तर एक आक्षेपकर्ता हा दिनांक 23 ऑक्टोबर रोजी स्वतः जिल्हाधिकारी समक्ष हजर होऊन
आपला नगरपरिषदेला आक्षेप नसलयाचा व एका भाजप नेत्याच्या विनंतीरुपी दबावात भूलथापांना व खोट्या माहितीमुळे आपण लेखी आक्षेप टाकल्याचे नेत्यांच्या नावासह माहिती देऊन क्षमापत्र दाखल केले आहे.
उर्वरित तीन आक्षेप कर्त्याना पोलिसां तर्फे समन्स बजावून जिल्हाधिकारी कार्यालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून मागील 27 वर्षांपासून प्रलंबित असलेली नगरपरिषद स्वतःच्या स्वार्थासाठी थांबविण्या करिता कट – कारस्थान होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here