घुग्घुस : आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी घुग्घुस काँग्रेस कार्यलयात स्वातंत्र्य संग्राम सैनिक देशाचे पहिले गृहमंत्री व उप प्रधानमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त
तसेच देशाच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून समूर्तीस अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांनी सरदार पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अखंड व एकसंघ भारत निर्मितीत पटेलांचा सिंहाचा वाटा होता.
देशातील महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली व त्यांच्या देश हितार्थ घेतलेल्या कडक निर्णयामुळे ते लोहपुरुष म्हणून गौरविले गेले.
आज देशातील केंद्र शासनाने नफ्यात असलेले उद्योगाचे खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे तर इंदिराजींनी देशभरातील कोळश्याचे खाजगी खाणीचे राष्ट्रीयीकरण करून देशाची प्रगती साधली होती.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, नकोडा उप – सरपंच मोहम्मद हनिफ शेख, अजय उपाध्ये, अनिरुद्ध आवळे,कल्याण सोदारी,बालकिशन कुळसंगे,विशाल मादर, नुरूल सिद्दीकी,रोशन दंतलवार, संजय कोवे, संपत कोंकांटी, रंजित राखूडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.