चंद्रपूर : कापूस पिकावर पून्हा एकदा बोंड अळीचे आक्रमण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. चंद्रपूरातील बहूतांश भागातील कापूस पिकांचे बोंड अळीने मोठे नूकसाण केले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहणी केली. यावेळी कापसाचा बोंड अळीमूळे पूणर्ताह खराब झाल्याचे दिसून आले. एकदंरीतच कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंड अळीने १०० टक्के नुकसाण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्व नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करा अशा सूचना आ. किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. सदर नुकसाणीची माहिती कृषीमंत्री यांना देणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे. या यावेळी तालुका कृषी अधिकारी ठाकरे, तालुका कृषी सहाय्यक अधिकारी गायकवाड, धानो-याच्या ग्रामसेविका वर्षा मानकर, तलाठी शैलेश दुवावार, प्रभाकर धांडे, गणपत कुडे, अरुन तुराणकर, पारस पिंपळकर, नंदकिशोर वासाडे, प्रविण पिंपळशेंडे, पंकज पूप्ता, मून्ना जोगी चंद्रकांत खांडेकर, जंगलू पाचभाई, राकेश पिंपळकर. आदिंची उपस्थिती होती.
अनियमीत पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलामूळे शेतक-यांना दरवर्षी नुकसाणीचा सामना करावा लागत आहे. यंदाही मोठ्या आशेने फुलवलेले शेत बोंड अळी व मावा सारख्या रोगाने नष्ट केले आहे. त्यातच परतीच्या पावसाचाही शेतपीकांना चांगलाचा फटका बसला असून तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्या आहे. त्यामूळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागांचा दौरा करत नुकसाणग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी मारडा, पिपरी. धानोरा गावांना भेट दिली. या सर्व गावातील कापूस पिकांचे जवळपास सारखेच नुकसाण झाले असल्याचे निदर्शनास आले. उगवलेल्या बोंडावरच बोंड अळीने आक्रमण केल्याने बोंडाचे नुकसाण झाले असून वेचणी करणे शेतकर्यांना कठीण झाले आहे.
उत्पादन खर्च प्रचंड वाढत असतांना उत्पादनात होणारी घट शेतकर्यापुढे मोठे संकट आहे. बोंडे तयार होत असतांना अळीचा प्रादुर्भाव झाल्याने या भागातील शेतक-यांचे १०० टक्के नूकसाण झाले आहे. कृषी मंत्री यांची भेट घेऊन त्यांना सदर नुकसाणीबाबत माहिती देणार असल्याचे सांगत या भागातील पंचणामे तात्काळ करा अशा सूचना त्यांनी दिल्या.