चंद्रपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर किसान आंदोलन तर्फे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.गांधी चौक चंद्रपुर येथून या आंदोलनाला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा नेण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात येईल.
शेतमालाच्या हमी भावासाठी कायदा तयार करण्यात यावा या प्रमुख मागणीला समर्थन देण्यासाठी तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या विरोधात सरकारने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.आंदोलनामध्ये चंद्रपुरात स्थिर झालेले मुळचे पंजाब, हरियाणा,उत्तर प्रदेश इत्यादी प्रांतातील शेतकरी व शेतकरी पुत्र सुद्धा सामील होणार आहेत. या आंदोलनामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेले आहे.