मृतदेह रस्त्यावर ठेवून नातेवाईकांनी ठोकली धूम

0
288

ब्रह्मपुरी ( चंद्रपूर ) : अंतिम यात्रा म्हटले की मृतकाच्या नातलगांसाठी दु:खी आणि वेदनांची अशी प्रवास यात्रा, मात्र याच अंतिम यात्रेवर मधमाशांनी हल्ला केल्याने मृतदेह सावरणाऱ्या मृतकाच्या दोन मुलांसह अन्य पाच जवळच्या नातलगाला रुग्णालयात दाखल होण्याची पाळी आली. यामुळे वेदनादाई अंतिम यात्रेत मधमाशांनी पुन्हा वेदनेचे चटके दिल्याचा प्रकार ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथे गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली
वांद्रा येथील कोंडबा महागु वाडगुरे वय 65 यांचा बुधवारी सायंकाळी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी पत्नी, मुले, मुली व नातलग उपस्थित अंतिम यात्रा स्मशानभूमीकडे निघाली. दरम्यान गावाच्या वेशीवर असलेल्या विसाव्यावर महिलांच्या अंतिम धार्मिक कार्यासाठी मृतदेह ठेवण्यात आला‌ मात्र याच वेळेस अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांनी हल्ला करताच उपस्थितांमध्ये एकच धावपळ झाली. नागरिकांनी व महिलांनी कसाबसा गाव गाठला. यामुळे मृतकाच्या पत्नी, मुली,मुले यांना अखेरचे धार्मिक सोपस्कार पार पाडता आले नाही. यावेळी मृतदेह सोडून पडणाऱ्या नातलगांवर मधमाश्यांनी हल्ला चढविला. यात मृतकाचे मुले नामदेव, नारायण, पुतण्या श्रीकृष्ण वाडगुरे, श्रीहरी गुरुणुले, वसाके, चंद्रदीप लेंनगुरे, गंभीर जखमी झाले. यावेळी बराच काळ मृतदेह विसाव्या वर पडून होता. दरम्यान काही वेळानंतर मधमाशांचा कल बघत निलेश वाघरे, तेजस पाल, राजू चापले, केवळराज गुरणुले यांनी हिंमत दाखवून मृतदेह विसाव्या वरून उचलला व काही अंतरावर येऊन तो ट्रॅक्टरने स्मशानभूमीत पोहचवले. यानंतर नागरिकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार पार पाडण्यात आले मात्र जखमी असलेल्या मुले व नातलगांना आवळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. यामुळे सख्या मुलांना वडिलांचे अंतिम संस्कार पार पाडता आली नाही. परिसरात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleरावण दहन बंद करा नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्थेची मागणी
Next articleसात वर्षाच्या दीर्घप्रतिक्षे नंतर किशोर सहारे यांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here