घुग्घुस नगरपरिषद विरोधी नेत्या व पत्रकारांचा महिलां तर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

0
518

घुग्घुस ( चंद्रपूर ) : आज दशहरा वाईट प्रवृत्ती दहन करण्याचा दिवस घुग्घुस येथील जागृत महिला शक्तींनी एकत्रित येत घुग्घुस विकासाला पोषक होऊ घातलेल्या नगरपरिषदला आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक स्वार्थासाठी नागरिकांना खोटा आक्षेप घेण्यास लावणाऱ्या भाजप नेत्यांचा व या नेत्यांला मदद म्हणून घुग्घुस नगरपरिषदचे आश्वासन हवेत विरले या मथळ्याखाली बातमी प्रकाशीत करणाऱ्या पत्रकारांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेद व्यक्त केला.
संतापीत महिलांनी नगरपरिषदला व्यक्तीगत स्वार्थासाठी विरोध करणाऱ्याचा वेळ प्रसंगी झाळू चपलेने स्वागत करण्याचा मानस ही व्यक्त केला आहे.
तब्बल 27 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर महाविकास आघाडी शासनाने घुग्घुस नगरपरिषदला हिरवा कंदील दिला.
व लगेच शासकीय उदघोषणा होऊन नगरपरिषद निर्मितीची नियमानुसार प्रक्रिया शुरू आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांचे आक्षेप मागविले यात ऐकून सहा लोकांनी लिखित स्वरूपात आपला विरोध नोंदविला मात्र यातील एका व्यक्तीने 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी समोर आपण भाजप नेत्यांच्या खोट्या भूलथापामुळे विरोध दाखल केला असून आपला नगरपरिषदला समर्थन असून आपण दाखल केलेल्या आक्षेपा करिता क्षमा मांगतो असा क्षमा पत्र दिले त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी भाजप नेत्याने खोट्या हरकती दाखल करवून घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला तसेच नगरपरिषद निर्मितीची प्रक्रिया नियमानुसार शुरू असतांना नागरिकांत संभ्रम पसरविणे तसेच त्या तथाकथित नेत्याला बातमी द्वारे सहयोग देणाऱ्या पत्रकारांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी घुग्घुस येथील विविध वॉर्डातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here