बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यु

0
611

चामोर्शी (गडचिरोली) : तालुक्यातील ठाकुरनगर येथे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शौचास गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

माया जगदीश हलधर रा.ठाकुरनगर ता चामोर्शी जि गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करीत आहे.गावकऱ्यांनी मानवी वस्तीला लागून असलेल्या जंगलात बिबटया सोडल्याने गावकऱ्यांनी वन विभागावर रोष व्यक्त केला आहे.वनविभागाने या बिबट्याचा त्वरित जेरबंद करावे व 10 लाख रुपयांची त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here