बल्लारपूर (चंद्रपूर) : बामणी प्रोटिन्स येथील हंडीची स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या ६ कामगाराचा आज दुपारी १:३० च्या सुमारास जीव गुदमरून विशाल वसंतराव मावलीकर- ३० या कामगाराचा मृत्यू तर ईतर पाच कामगार गंभीर झाले आहेत. सर्व गंभीर कामगारांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
बल्लारपूर शहरालगत असलेल्या बामणी प्रोटिन्स हि हड्डीपासून प्रोटिन्स पावडर तयार करण्याचा कारखाना आहेत. नेहमीप्रमाणे टॅंक’ची स्वच्छता करण्यासाठी ६ कर्मचारी दुपारी १:३० च्या सुमारास १५ फूट हंडीत उतरले होते. मात्र, हंडीत ऑक्सिजन’चा पुरवठा कमी पडल्याने या अपघातात विशाल वसंतराव मावलीकर वय-३० रा-दहेली ( लावारी ) या कामगाराचा मृत्यू तर शैलेश गावंडे वय- ३६, बंडू निवलकर-३५, रा-बल्लारपूर, मनोज परशुराम मडावी वय-३२ रा- बामणी, कपिल परशुराम मडावी वय- ३३ रा- बामणी, अविनाश वासुदेव चौधरी वय- ३६, रा-दहेली हे कामगार गंभीर झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर नगर परिषदेची रुग्णवाहिका अल्पावधीतच घटनास्थळी पोहचल्याने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर कामगार आणि परिसरातील गावातील लोकांनी काही काळ जमाव केला होता. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमाव कमी केला.
झालेली घटना दुःखद असून, मृतक आणि गंभीर व्यक्तीच्या आम्ही पाठीशी आहोत. कारखान्याच्या वतीने त्यांना परिपूर्ण मदत दिली जाईल.
सतीश मिश्रा
( मॅनेजर एच.आर विभाग )