तळोधी (बा) चंद्रपूर : काल सायंकाळी जवळपास 6 : 30 ला तळोधी कडून नागभीड ला जात असलेल्या श्री. डॉ. अनिल कोरपेनवार, प्राचार्य महात्मा गांधी कालेज नागभीड, यांच्या मालकीची ,फोर्ड कंपनीच्या इकोस्पोर्ट कार क्रमांक.MH -40-BE-7129 ने रस्ता ओलांडत असलेल्या रानगव्याला जोरदार धडक दिली. यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार 40 मिटर रस्याच्या कडेला पलटत गेली. मात्र यात कोरपेनवार यांना किरकोळ जखमा झाल्या मात्र जोरदार धडक लागल्याने रानगव्यला गंभीर दुखापत झाली आहे. रात्र भर रानगवा घटना स्थळाच्या पासून 100 मिटर अंतरावर सामाजिक वनीकरण विकास महामंडळ बाळापूर चे कक्ष क्र.69 मिंडाळा बिटात जख्मी आढळून आला आहे.
आज सकाळी सामाजिक वनीकरण विभागाच्या, वर्षा धुर्वे मँडम वनरक्षक मिंडाळा, श्री काळबांधे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विकास महामंडळ बाळापूर, यांनी मोक्का पंचनामा केला. वाहन जप्ती करन्यात आले आहे.