ऑनलाईन शिक्षण बंद केल्यास मुख्याध्यापकांवर होणार कारवाई

0
113

चंद्रपूर : देशात कोरोनाच्या उद्रेकाने सध्या शाळा पूर्णपणे बंद असल्याने शाळा व्यवस्थापकांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला, मात्र ह्या ऑनलाइन शिक्षण काळात शाळा व्यवस्थापनाने शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षणच बंद केले.

शैक्षणिक हित विचारात घेतले तर शाळेची ही कृती समर्थनीय मुळीच नाही, चंद्रपुरात असे अनेक प्रकार घडलेले आहे.
शिक्षण उपसंचालक यांनी नागपूर विभागातील चंद्रपूर, भंडारा , गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे आदेश दिला आहे की शैक्षणिक शुल्क न भरल्याने ज्या शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन लिंक उपलब्ध केली नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
हा आदेश संबंधित जिल्ह्यातील विना अनुदानित, सीबीएससी व इतर शाळांना लागू राहणार.
जर ऑनलाईन शिक्षण सुरू असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचे कारण विद्यार्थ्यांना सांगणे बंधनकारक असणार आहे.
या आदेशाने काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here