घुग्घुस (चंद्रपूर) : येथील विविध समाजीक संस्था, राजकीय पक्ष व जनतेतर्फे सातत्याने विविध स्वरूपाच्या लक्षवेधी आंदोलनाने शासणाचे लक्ष वेधण्यात आले मात्र मागील 27 वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदचा दर्जा मिळाला नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले म्हणून घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी हे सातत्याने पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होते.
महाविकास आघाडी शासनाने जनसामान्यांच्या जन भावना लक्षात घेता घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने नगरपरिषदची उदघोषणा ही जाहीर करण्यात आली.
शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी यांच्यातर्फे नागरिकांच्या आक्षेप हरकती मागविण्यात आले त्यानुसार घुग्घुस येथील सहा नागरीकांनी लेखी आक्षेप घेतला या सर्वांची जनसुनावणी 13 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष घेण्यात आली यामध्ये फक्त दोन नागरिक उपस्थित होते.
यानंतर दिनांक 23 ऑक्टोबर रोजी एका आक्षेप कर्त्याने भाजप नेत्यांच्या भुलावणीमुळे आपण लेखी आक्षेप घेतल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लिखित खुलासा केला यामुळे घुग्घुस येथील भाजप नेते हे नगरपरिषद विरोधी असून यांनी या सहा आक्षेप कर्त्याना आमिष दाखवून अथवा दबाव टाकून नगरपरिषद विरोधात आक्षेप घेण्यास भाग तर पाडले नाही ना ?
या करिता सर्व सहा ही आक्षेप कर्त्यांची शासकीय स्तरावर चौकशी करण्यात यावी.
ज्यांनी लेखी आक्षेप घेतला मात्र सुनावणीला गैरहजर राहीले यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच ज्या नेत्यांनी आक्षेप कर्त्यावर दबाव अथवा आमिष अथवा भूलथापां देऊन आक्षेप टाकण्यास लावले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणी करिता घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदनातून मागणी केली आहे.