वरोरा (चंद्रपूर) : वरोरा – चिमूर महामार्गाचे गेल्या चार वर्षांपासून अतिशय संथ गतीने काम सुरू आहे .चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे चार वर्षात बरेच अपघात झालेले आहेत.या बाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने येत्या 26 ऑक्टोबर रोज सोमवारला एस आर के कंपनीच्या प्रोजेक्ट ऑफिस समोर भव्य रक्तदान शिबीर व बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचे ठरले आहे.
वरोरा चिमूर मार्गाने गाडी चालविने म्हणजे जीव मुठीत घेऊनच जावे लागते . जागो जागी अर्धवट करून ठेवलेल्या कामामुळे अनेक अपघात या मार्गाने झाले आहे .दुचाकी सोडा चारचाकी वाहणाचेही तीन तेरा वाजल्या शिवाय रहात नाही.प्रहार जनशक्ती पक्षाने या बाबत गेल्या 3 वर्षांपासून जिल्हा प्रशासनाला अनेक निवेदने दिलेली आहे .तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनीही या निवेदनाची दखल घेऊन काम जलद गतीने करण्याचे निर्देश दिले होते .पण त्यांच्याही आदेशाला केराची टोपली या मुजोर व्यवस्थापनाने दाखवून सर्व नियम धाब्यावर टांगून नागरिकांच्या जीवाची पर्वा न करता चुकीच्या पद्धतीने रोड चे बांधकाम केलेले आहे .एवढेच काय तर साखरा मोखाळा गावा लगत अनधिकृत रित्या गिट्टी खदान सुरू करून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केलेले आहे .अशा एक ना अनेक मागण्यांना घेऊन प्रहार आता आक्रमक झाली असून प्रहार सेवकांनी या मुजोर कंपनीला धडा शिकविण्यासाठी एल्गार पुकारला आहे . आता ही लढाई प्रहार सामान्य जनतेसाठी रक्त देऊन सुरू करणार असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत ही लढाई सुरू राहील असे ही आंदोलन कर्ते म्हणाले . या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार सेवक आशिष घुमे , अक्षय बोन्दगुलवार, शेरखान पठाण , किशोर डुकरे , गणेश उराडे , मुज्जू शेख , अमोल दातारकर तथा तालुक्यातील प्रहार सेवकांनी केले आहे .
राजकीय दबावाखाली प्रशासनाने आंदोलनाची परवानगी नाकारली
लोकशाही मार्गाने होत असलेले आंदोलन हे रक्तदान म्हणजेच राष्ट्रीय कार्यक्रम घेऊन प्रहार सेवक करणार आहेत .प्रत्येक लोकहिताच्या कार्यापूर्वी रक्तदान करणे ही प्रहार सेवकांची परंपरा आहे.अतिशय शांततामय मार्गाने हे आंदोलन होत असताना या आंदोलनासाठी प्रशासन आडकाठी आणत असेल हे चुकीचे असून महसूल व पोलीस प्रशासन राजकीय दबावा खाली काम करत असल्याचा आरोप आशिष घुमे यांनी केला असून आम्हाला रक्तदान करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि आम्ही ते करणारच असेही ते यावेळी म्हणाले .
आंदोलनाला प्रहार वाहन चालक मालक संघटनेचा ही पाठिंबा
सदर आंदोलनाला जिल्हातील प्रहार वाहन चालक मालक संघटनेचा पाठिंबा असल्याची माहिती सोशल मीडियावर संघटनेचे राज्य संघटक प्रवीण वाघे यांनी प्रसारित केली आहे.