कोरपना (चंद्रपूर) : तालुक्यात कापूस खरेदी सुरू असून हमी भावा पेक्षा कमी दराने खरेदी करीत असल्या मूळे व कापूस पिकावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सासना कडून नुकसान भरपाई देण्यात यावी या करिता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
या वर्षी कापूस खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून खरेदी करीत असून व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करीत आहे क्विंटल मागे रू४२०० ते ४४००/दराने खरेदी सुरू आहे शासनाचे हमी भाव रू.५८००/आहे. शासन नियमानुसार हमी भावाने खाजकी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करावा अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे
कोरपना तालुक्यात यावर्षी कापूस पिकावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे संपूर्ण कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तरी कापूस पिकाचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी . या मागणी करिता मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन सादर करते वेळी उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर , श्याम भाऊ रणदिवे माजी सभापती तथा सदस्य समिती कोरपना, संभाजी पा कोवे माजी उपसभापती तथा सदस्य प स कोरपना, भाऊराव पाटील चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना, गणेश गोडे माजी युवक काँग्रेस अध्यक्ष कोरपना, सुधाकर नांदेकर उपसरपंच ग्राम पंचायत सोनुर्ली, रामचंद्र पा बलकी माजी सरपंच, सुधाकर पा घागीं, रसूल भाई शेख, मनोहर चन्ने उपाध्यक्ष नगर पंचायत कोरपना, हितेश राठोड, प्रमोद पायघन उपस्थित होते