ब्रम्हपुरी : माहे आगस्ट- सप्टेंबर महिन्यात आलेल्या वैनगंगेच्या महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावाला पाण्याने वेढा दिल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते यात अनेक घरे पडली तर घरांमध्ये पाणी शिरल्याने काही घरांना तडा गेलेला आहे. शासनाने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे मात्र येथे झालेला सर्वे मधून अनेक पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत वंचित असलेल्या पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.
वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका तालुक्यातील 65 गावांना बसला आहे यात अठरा 18 गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने यात अनेक घरे पडली अनेक घरांना भिंतींना तडे गेले आहेत हजारो हेक्टर शेतीच्या पिकांची नुकसान झालेला आहे अनेक शेतात गाळ असल्याने शेती नापिकी झालेल्या आहेत पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाने मदत जाहीर केली आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्यात आला मात्र सर्वे करताना अनेक पूरग्रस्तांना डावलण्यात आल्याने नुकसान होऊनही अनेक पूरग्रस्त लाभार्थी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत रणमोचन गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही रणमोचन गावाची पाहणी केली व प्रत्येक पूरग्रस्तांना याचा लाभ दिला जाईल, कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही याचे आश्वासन दिले होते. यावेळी गावामध्ये तलाठी सुद्धा हजर होते मात्र सर्वे करतांनी अनेकांची नावे सर्व्हेतून डावलल्याने पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहिले रणमोचन येथील वंचित पूरग्रस्तांनी आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या पारोमिता गोस्वामी यांच्याकडे आम्ही अनुदानापासून वंचित असून आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी रणमोचन येथील वंचित पूरग्रस्तांची दखल घेत कोणीही मदतीपासून वंचित राहू नये याकरिता ब्रह्मपुरी येथील तहसीलदार विजय पवार यांना निवेदन दिले.
पूरग्रस्तांच्या झालेल्या सर्वे मधून पाच लोकांची घरे पूर्णता पडझड झाली असूनही त्यांना डावलण्यात आले तर सानुग्रह अनुदानाचा करिता पात्र असूनही 11 कुटुंबांना डावलले व 37 व्यक्तींच्या घरामध्ये पुराचे पाणी गेले नाही तरी त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आला तर अंशता पडझड झालेल्या यांच्या सर्वेमध्ये ही सर्व अधिकाऱ्यांनी घोळ केलेला आहे ज्यांच्या घरात पाणी शिरले नाही अशाही लोकांना अंशता नुकसान झाल्याचे दाखवून त्यांना आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे व जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना अंशता मधुन डावलण्यात आलेली आहे पक्षपात करून सर्वे करण्यात आल्याचा आरोप करीत रणमोचन येथील वंचित पूरग्रस्तांनी न्याय मिळवून देण्याची मागणी ऍड.पारोमिता गोस्वामी यांच्याकडे केली आहे.