वरोरा (चंद्रपूर) : सध्या शेतकऱ्यांचा शेतमाल निघायला सुरवा त झाली असून तो विक्री करिता शहरात वाहनांच्या माध्यमातून आणला जात आहेत . पण महामार्ग पोलीस व वाहतूक पोलीस त्यांना अडवून दंड आकारात असल्याच्या तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या .या विषयाला घेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक आशिष घुमे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांची भेट घेवून सविस्तर चर्चा करीत निवेदन दिले . निवेदनाची दखल घेत पांडे साहेबांनी संबंधित अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नका अशा सूचना दिल्या यावेळी प्रहार सेवक विक्की तवाडे, प्रमोद देठे , अक्षय बोंदगुलवार, ओंकार कांबळे , अनिल पुरी हे उपस्थित होते